ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मुकेश अंबानींना ४० कोटींचा दंड; शेअर ट्रेडिंगमध्ये फेरफार

मुंबई : कंपनीच्या शेअर ट्रेडिंगमध्ये फेरफार केल्याबद्दल ‘सेबी’ने रिलायन्स इंडस्ट्रीज आणि तिचे चेअरमन मुकेश अंबानी यांना 40 कोटींचा दंड ठोठावला आहे. यामध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजला 25 कोटी, तर अंबानी यांना 15 कोटींचा दंड सुनावण्यात

आला आहे. रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअर ट्रेडिंगशी संबंधित हा प्रकार असून, नवी मुंबई सेझ लिमिटेडला 20 कोटी आणि मुंबई सेझ लिमिटेड 10 कोटींचा दंड भरावा लागणार आहे.

रिलायन्स पेट्रोलियम ही स्वतंत्र लिस्टेड कंपनी होती. मार्च 2007 मध्ये रिलायन्स इंडस्ट्रीजने रिलायन्स पेट्रोलियमचे 4.1 टक्के शेअर विकण्याची घोषणा केली. कंपनीचे भाव गडगडू लागल्यानंतर कंपनीने नोव्हेंबर 2007  मध्ये रिलायन्स पेट्रोलियमच्या शेअर खरेदी-विक्रीचे व्यवहार करण्यात आले.

‘सेबी’ने केलेल्या चौकशीवेळी शेअरचे भाव प्रभावित करण्यासाठी हे व्यवहार चुकीच्या पद्धतीने करण्यात आल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे हा दंड करण्यात आला आहे. अशा पद्धतीने व्यवहार केल्याने शेअर बाजारावरील गुंतवणूकदारांच्या विश्वाळसाला तडा जाईल, असे ‘सेबी’ने म्हटले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!