मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यामध्ये आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत अताना आता भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी थेट आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघात केला आहे.
आ.राणे म्हणाले कि, आमदार भास्कर जाधव हे सिनिअर असताना देखील विरोधी पक्ष नेते पदासाठी उद्धव ठाकरे यांनी आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे केले आहे. म्हणजेच तिकडे भास्कर जाधव केवळ यांना केवळ सतरंज्या उचलायचे काम राहिले आहे. त्यामुळे आता नाराजी शिवाय त्यांच्यापुढे दुसरा पर्यावरण नसल्याची टीका भाजपचे मंत्री नितेश राणे यांनी केली आहे. या माध्यमातून नितेश राणे यांनी भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे गटावर जोरदार हल्ला चढवला.
आ.राणे म्हणाले की, भास्कर जाधव आठ – नऊ वेळा निवडून आल्यानंतर देखील विरोधी पक्ष नेत्याचे नाव पुढे करायचे असताना आदित्य ठाकरे यांचे नाव पुढे करण्यात आले आहे. त्यामुळे आता भास्कर जाधव यांच्यापुढे दुसरा पर्याय उरलेला नाही. भास्कर जाधव यांची तिथून इनिंग संपलेली आहे. त्यांना आता आजूबाजूच्या सतरंज्या, मोबाईल वगैरे उचलणे एवढेच काम शिल्लक राहिले असल्याचे नितेश राणे यांनी म्हटले आहे.
उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना पक्षामध्ये भास्कर जाधव हे नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू आहे. उद्धव ठाकरे यांनी बोलावलेल्या पक्षाच्या बैठकीला देखील भास्कर जाधव उपस्थित राहिले नाही. मला माझ्या क्षमतेप्रमाणे काम करण्याची संधी मिळाली नसल्याची खंत त्यांनी यापूर्वी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली होती. त्यानंतर भास्कर जाधव हे उद्धव ठाकरे यांची साथ सोडणार का? या बाबत वर्क लावले जात होते. मात्र मी उद्धव ठाकरे यांच्या सोबतच असून त्यांची साथ सोडणार नसल्याचे भास्कर जाधव यांनी स्पष्ट केले होते. मात्र तरी देखील भास्कर जाधव हे पक्षात नाराज असल्याचे बोलले जात आहे.
या वेळी मंत्री नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यावर देखील टीका केली. देशात राहुल गांधी जसे भाजप वाढवत आहेत, तसेच काम आदित्य ठाकरे हे महाराष्ट्रात करत असल्याचे राणे यांनी म्हटले आहे. देशातील राहुल गांधी यांची भूमिका आदित्य ठाकरे महाराष्ट्रात पार पाडत असल्याचे मंत्री नितेश राणे यांनी म्हटले आहे. आदित्य ठाकरे म्हणजे ‘पप्पूचे महाराष्ट्र व्हर्जन’ असल्याची टीका देखील नितेश राणे यांनी यावेळी केली.