ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोटमधील शिवजयंतीच्या मिरवणुकीत अवतरले प्रयागराज

साहसी खेळांच्या प्रदर्शनाने वेधले सर्वांचे लक्ष

अक्कलकोट :  तालुका प्रतिनिधी

विविध मर्दानी खेळ,तलवार, दांडपट्टा,लाठी,काठी,मल्लखांब, कुंभमेळा भगवान भोलेनाथांची मुर्ती यासह विविध जिवंत देखाव्याने अक्कलकोट येथील श्री राजा छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय संस्थेच्या शिवजयंती मिरवणुकीने उत्सवाची सांगता झाली.

या मिरवणुकीत प्रयागराज येथील कुंभमेळ्याचा फील आल्याने शहरातील नागरिकांची व महिला वर्गाची मोठी गर्दी झाली होती.छत्रपती शिवाजी महाराज चौक एस.टी .स्टँड परिसरातून सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मिरवणुकीला प्रारंभ झाला.ही मिरवणूक बस स्थानकापासून विजय चौक, कारंजा चौक ,सेंट्रल चौक ,फत्तेसिंह चौक मार्गे ,कमलाराजे चौक,ए-वन चौक येथून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकात याची सांगता करण्यात आली.

या मिरवणुकीचे उद्घाटन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, माजी नगरसेवक मिलन कल्याणशेट्टी,बसलिंगप्पा खेडगी,प्रथमेश इंगळे,महेश हिंडोळे यांच्या हस्ते व शिवराम प्रतिष्ठानचे अध्यक्ष बापु वाडेकर, सद्दाम शेरीकर शिवसेना महिला जिल्हा प्रमुख रविना राठोड, सुरेश सुर्यवंशी,मंगेश फुटाणे,अमर शिरसट अभिषेक लोकापुरे, विपुल दोशी,किशोर सिध्दे,श्रीकांत वाडेकर, शैलेश राठौर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.उपस्थित मान्यवरांचा सत्कार संस्थापक अध्यक्ष तम्मा शेळके,सचिव अतुल जाधव,उत्सव समितीचे अध्यक्ष वैजिनाथ मुकडे,कार्यध्यक्ष जाकिर तांबोळी,सचिव शेखर वाले,सहसचिव सचिन गडकरी,उपाध्यक्ष भिमा कोळी, कोषाध्यक्ष अनिल मोरे, सहकोषाध्यक्ष सुनील सोनटक्के आदींनी केला.मिरवणूकीचे नेतृत्व इंजिनिअर वरुण शेळके,संतोष पवार, सुहास सुरवसे, प्रभुराज गाबणे, स्वामी बेंद्रे यांनी केले तर दादा शिंदे ,इरण्णा गवंडी,अनिल लोणारी, संजय जमादार, बाळु खैराटकर,
सिध्दु पाकणीकर,स्वामी चव्हाण, कुमार भिसे,रमेश शंभेवाड,रवि कोरे आदींनी त्यांना सहकार्य केले.या मिरवणुकीत विविध मर्दानी खेळ,कुंभ मेळाचा देखावा हे यंदाच्या उत्सवाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले. या देखाव्यामध्ये सहभागी झालेले कलाकार हे देश आणि राज्याच्या विविध भागातून सहभागी झाले होते. ही कला पाहण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा शिवभक्तांची मोठी गर्दी झाली होती.या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अतुल जाधव यांनी केले तर आभार राहुल शेळके यांनी मानले.

शिवकालीन साहसी खेळांचे प्रदर्शन  दरवर्षी मंडळाचे संस्थापक तम्मा शेळके  हे काही ना काही वेगळा देखावे सादर  करून मिरवणुकीकडे सर्वांचे लक्ष वेधतात. यावर्षी कुंभमेळ्यातील अघोरी साधूंना आणून शहरवासीयांचे लक्ष चांगलेच वेधून घेतले. विशेष म्हणजे शिवकालीन कलेचे प्रदर्शन या मिरवणुकीत घडल्याने शिवप्रेमींनी समाधान व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!