मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून राज्यातील बीड जिल्ह्यातील सरपंच खून प्रकरण मोठ्या चर्चेत असतांना आता वाल्मीक कराडला वाचवण्यासाठी चार्जशीटमध्ये काही गोष्टी लिहण्यात आल्या आहेत का? ह्या कराडसाठी पळवाट तयार केल्या आहेत का? असा सवाल अंजली दमानिया यांनी म्हटले आहे.
अंजली दमानिया पुढे बोलताना म्हणाल्या की, वाल्मीक कराड हे कारागृहातून दोन दोन तास व्हिडिओ कॉल करत लोकांशी बोलत आहे. दोन दिवसांपूर्वी जेल अधिकाऱ्यांनी पत्र लिहले आहे की आमचे सीसीटीव्ही चालत नाहीये. म्हणजे आम्हाला कोणाला उत्तर देण्याची गरज नाही.
अंजली दमानिया म्हणाल्या की, जेलमधील सीसीटीव्ही सुरू नसल्याने कोणीही येईल आणि कराडची भेट घेईल. आम्हाला अशी माहिती मिळत आहे की, चहा नाश्ता दिला जात आहे. वकीलाच्या नावाने कुणीही येते आणि गप्पा मारतंय भेट घेत आहे. सामान्य लोकांसाठी हे होईल का? राजकीय दबावातून हे होत आहे. हे जर हटवायचे असेल तर धनंजय मुंडे यांना बडतर्फ करावे, अशी मागणी दमानियांनी केली आहे.
अंजली दमानियांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, बीड स्व संतोष देशमुख प्रकरणातल्या कालच्या चार्जशीट मधे हे कसे आणि का लिहिले गेले ? 1. पान 36 वर “टोळीचा प्रमुख सुदर्शन घुले” असे का लिहिले ? तो टोळीचा प्रमुख कसा ? पुढच्या पानावर जरी वाल्मिक कराड नंबर 1 वर असेल, तरीही हे वाक्य वगळले पाहिजे 2. वाल्मिक कराड बद्दल फक्त लिहिण्यात आले की त्यांनी “आता जो कोणी आड येईल त्याला अडवा करावा लागेल” असे त्यांनी सुदर्शन घुले यांना सांगितले आणि “कामाला लागा आणि विष्णु चाटे शी बोलून घ्या “ एवढेच चार्जशीट मधे लिहिले आहे . उद्या वाल्मिक कराड म्हणतील …. मी कुठे त्यांना मारा असे म्हटले ? ही सुटण्याची पळवाट आहे का ?