बुलढाणा : वृत्तसंस्था
राज्यातील बुलढाणा जिह्यातील पिंपळगावसैलानी येथे गुरुवारी १३ मार्च रोजी हजारो नारळाच्या होळींची प्रथा असलेल्या हाेळीचा उत्सवसाजरा केला जाणार आहे. या होळीत नारळालाबाहुले, गोटे, बिबे, लिंबू, खिळे ठोकून ते मनोरुग्णाच्याअंगावरुन आेवाळून होळीत टाकले जातात. अंगावरीलकपडेही या होळीत टाकण्याची पंरपरा अाजवर चालतअाली अाहे. मागील वर्षी एका अज्ञाताने ही होळीपेटवली होती.
मागील चार दिवसांपासून या यात्रेसाठी भाविकांचीवर्दळ वाढली अाहे. या भाविकांच्या उपस्थितीतगुरुवारी दुपारी तीन वाजता मुजावर यांच्या हस्ते पूजाविधी करुन होळी पेटवली जाणार आहे. या ठिकाणीयात्रेकरुंचे मात्र हाल होत असतात. पिण्याच्या पाण्याचीव्यवस्था नसते, प्रसाधन गृह नसल्याने उघडयावरचघाण करत भाविक निघून जातात. तर १९ मार्च रोजीच्यासंदलसाठीही भाविक थांबतात. काही भाविक नव्यानेदाखल होतात. अनेक भाविक झोपड्या करून राहतआहेत. यात्रेचा मुख्य दिवस असलेल्या संदल यादिवशी लाखो भाविक सैलानीत येणार आहेत. यात्रासुरळीत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासन, पोलिसप्रशासन व सैलानी ट्रस्टच्या वतीने नियोजन करण्यातआले आहे.
जिल्हाधिकारी या यात्रेचे नियोजन बैठक घेऊनआधीच सूचना केलेल्या आहेत. पालकमंत्री यांनीहीयात्रेत पाण्याची व्यवस्था करण्याचे सांगितले आहे.मात्र, येथे पिण्याचे पाणी मिळेल याची शक्यता कमीअसते. शितपेये, अवैध धंदे या यात्रेत मोठयाप्रमाणात चालतात. याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मनोरुग्णांना बेवारस सोडणाऱ्यांवरही कार्यवाही होणेअपेक्षित आहे. येथे मनोरुग्णालये उभे करण्यासाठीअजूनही शासनाकडून पावले उचललेली नाहीत.