ध्यास विश्वसार्ह बातमीचा

उद्धव ठाकरेंना कोकणात मोठा धक्का : दिग्गज महिला नेत्या दादांच्या साथीला !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात गेल्या काही महिन्यापासून उद्धव ठाकरेंच्या पक्षातील अनेक नेत्यांसह पदाधिकारी शिंदे गटात दाखल होत असतांना आता महाड विधानसभा मतदारसंघातून शिवसेना ठाकरे गटाकडून निवडणूक लढलेल्या महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या स्नेहल जगताप ह्या आज अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना कोकणात आणखी एक मोठा धक्का मानला जात आहे. मागील काही दिवसांपासून स्नेहल जगताप या उद्धव ठाकरे यांची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू होती. मात्र त्यांनी अजित पवार गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

भारतीय जनता पक्षाच्या वाटेवर स्नेहल जगताप असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. मात्र अखेर त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. नुकताच स्नेहल जगताप यांच्या कुटुंबीयांनी सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली होती. त्यानंतर या दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय चर्चा झाली आणि स्नेहल जगताप यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांना पुन्हा एकदा कोकणात मोठा धक्का बसला आहे.

या मतदारसंघात स्नेहल जगताप आणि शिवसेना आमदार भरत गोगावले यांच्यात राजकीय वाद आहेत. राजकीय विरोधक म्हणून हे दोन्ही नेते ओळखले जातात. त्यातच दुसरीकडे भारत गोगावले आणि सुनील तटकरे यांच्यामध्ये पालकमंत्री पदावरून वाद सुरू आहे. रायगडचा पालकमंत्री कोण? याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही. या सर्व पार्श्वभूमीवर आता अजित पवार गटाची या मतदारसंघातील ताकद वाढली आहे. त्यामुळे भरत गोगावले यांची आता डोकेदुखी वाढणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

स्नेहल जगताप या महाड पोलादपूर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार माणिकराव जगताप यांच्या कन्या आहेत. तसेच त्या महाडच्या माजी नगराध्यक्षा देखील आहेत. त्यांनी काँग्रेस मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षांमध्ये विधानसभा निवडणुकीच्या काळातच प्रवेश केला होता. त्यांना पक्षाच्या वतीने विधानसभा निवडणुकीत तिकीट देण्यात आले होते. मात्र या मतदारसंघात भरत गोगावले यांनी स्नेहल जगताप यांचा पराभव केला होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!