ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भारतीय तटरक्षक दलात दहावी, बारावी उत्तीर्णसाठी नोकरीची संधी

मुंबई :  भारतीय तटरक्षक दलामध्ये दहावी, बारावी पास विद्यार्थ्यांसाठी सरकारी नोकरीसाठी चांगली संधी उपलब्ध झाली आहे.  भारतीय तटरक्षक दलाने एकूण ३५८ पदांसाठी ही भरती प्रक्रिया सुरू केली आहे. त्यात नाविक (DB, GD) आणि यांत्रिक पदे भरली जाणार आहेत. भारतीय तटरक्षक दलाचे अधिकृत संकेतस्थळ joincoastguard.cdac.in वर या भरती संदर्भातील विस्तृत माहिती उपलब्ध आहे आणि ऑनलाइन अर्जांची लिंकही उपलब्ध आहे. अर्ज करण्याची अखेरची मुदत १९ जानेवारी २०२१ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत आहे.

पदाचे नाव आणि एकूण जागा

– नाविक (जनरल ड्यूटी) – २६० पदे

– नाविक (डोमेस्टिक ब्रांच) – ५० पदे

– यांत्रिक (मेकॅनिकल) – ३१ पदे

– यांत्रिक ( इलेक्ट्रिकल) – ७ पदे

– यांत्रिक (इलेक्ट्रोनिक्स) – १० पदे

महत्त्वाच्या तारखा:

अर्ज प्रक्रियेला सुरुवात – ५ जानेवारी २०२१

अर्ज करण्याची अंतिम मुदत – १९ जानेवारी २०२१ सायंकाळी ६ वाजेपर्यंत

ई अॅडमिट कार्डाचं प्रिंट घेण्याची तारीख – पहिल्या टप्प्यातील परीक्षेच्या दहा दिवस आधी

नाविक आणि यांत्रिक भरतीसाठी स्टेज – १ – मार्च २०२१ चा मध्य किंवा अखेर

परीक्षेच्या संभाव्य तारखा

नाविक आणि यांत्रिक भरतीसाठी स्टेज – २ परीक्षेच्या संभाव्य तारखा – एप्रिल २०२१ चा मध्य किंवा अखेर

भरतीसाठी स्टेज – ३ आणि ४ परीक्षेच्या संभाव्य तारखा – ऑगस्ट २०२१ च्या सुरुवातीला

नाविक भरती (DB) स्टेज ३ आणि ४ परीक्षेच्या संभाव्य तारखा – ऑक्टोबर २०२१ च्या सुरुवातीला

 

निकालाची संभाव्य तारीख – २० दिवसांच्या आत स्टेज १ चा निकाल

नाविक आणि यांत्रिक भरती प्रशिक्षणाची तारीख – ऑगस्ट २०२१

नाविक (GD) भरती प्रशिक्षणाची तारीख – ऑक्टोबर २०२१

 

वयोमर्यादा

किमान वय – १८ वर्षे

कमाल वय – २२ वर्षे

नाविक (GD) आणि यांत्रिक भरतीसाठी उमेदवार १ ऑगस्ट १९९९ ते ३१ जुलै २००३ या कालावधीत जन्मलेला असावा.

नाविक (DB) भरतीसाठी उमदेवार १ ऑक्टोबर १९९९ ते ३० सप्टेंबर २००३ या कालावधीत जन्मलेला असावा.

आरक्षित प्रवर्गांसाठी सवलत लागू आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!