हेमंत नगराळे राज्याचे नवे पोलीस महासंचालक

मुंबई –  महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल यांची केंद्रात बदली झाल्याने त्यांच्या जागी पोलीस अधिकारी हेमंत नागराळे यांची नियुक्ती करण्यात आली असून ते महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक असणार आहेत.

पोलीस महासंचालकपदासाठी पोलीस अधिकारी संजय पांडे, बिपीन बिहारी यांची नावे चर्चेत होती. मात्र हेमंत नगराळे यांची वर्णी लागली आहे.

सध्या ते लीगल आणि टेक्निकल विभागाचे डीजी आहेत. आज दुपारी 3.30 वाजता ते अतिरिक्त कार्यभार स्विकारणार आहेत.

Leave a Comment