नागपूर,दि.२६ : कोरोना रुग्णांवरील उपचारादरम्यान वाढीव शुल्क घेणाऱ्या हॉस्पिटलकडून पाचपट दंड वसूल करण्याचा निर्णय राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी घेतला आहे.
आज ते नागपूर येथे बोलत होते.प्लाजमा उपचाराला प्रोत्साहन देण्यासाठी प्रती दोनशे मिलिलीटर प्लाजमा साठी पाच हजार पाचशे रुपये दर निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. राज्यात हॉस्पिटलकडून अव्वाच्या सव्वा पैसे वसूल करण्यात येत असल्याने यावर निर्णय सरकारने हा घेतला आहे.याबाबतच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात आरोग्य विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या.