---Advertisement---

ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे निधन

Follow Us:
---Advertisement---

मुंबई,दि.२६ : ऑस्ट्रेलियातील प्रसिद्ध माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचे हृदयविकाराने मुंबईत निधन झाले. ते 59 वर्षांचे होते. निवृत्तीनंतर क्रिकेटच्या विकासासाठी दक्षिण आशिया क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली होती. 1987 साली झालेल्या वर्ल्ड कप स्पर्धेत त्यांचा ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघात समावेश होता. आयपीएलच्या समालोचना साठी ते मुंबईत आले होते. त्यावेळी त्यांचे हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या निधनाबद्दल राज्यपाल भगतसिंग कोशारी यांनी दुःख व्यक्त केले आहे. आतापर्यंत त्यांनी 52 कसोटी सामने आणि 164 एकदिवसीय सामने खेळले आहेत. माजी क्रिकेटपटू डीन जोन्स यांचा ऑस्ट्रेलिया क्रिकेटमध्ये मोठा दबदबा होता.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!