---Advertisement---

ड्रग्ज प्रकरणात नवाब मलिक यांच्या जावयाला एनसीबीकडून समन्स

On: January 13, 2021 12:46 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून गाजत असलेल्या ड्रग्ज प्रकरणात आता राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांचे जावई समीर खान यांना नार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरो(एनसीबी)नं समन्स बजावलं आहे. आधीच धनंजय मुंडे यांच्यावर बलात्काराचे आरोप झाल्यामुळं गदारोळ उठला असतानाच मलिक यांच्या जावयाला समन्स आल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसची चिंता वाढली आहे.

समीर हे नवाब मलिक यांची कन्या निलोफर यांचे पती आहेत. समीर खान आणि करण संजानी यांच्यात ‘गुगल पे’च्या माध्यमातून २० हजार रुपयांचा व्यवहार झाला होता. ड्रग्ज पुरवण्याच्या बदल्यात हा व्यवहार झाला आहे, असा संशय एनसीबीला आहे. याच संदर्भात चौकशीसाठी समीर खान यांना बोलावण्यात आलं आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!