अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
लायन्स क्लब ऑफ अक्कलकोट यांच्या वतीने सेवा पंधरवडा निमित्त एक हात दिव्यांगांना मदतीचा या उपक्रमांतर्गत सोलापूर जिल्हा सामाजिक
कार्य समिती, सोलापूर संचलित अस्थिव्यंग व संमिश्र मतिमंद निवासी शाळेस व्हीलचेअर भेट देण्यात आली.
ही भेट लायन्स क्लबचे अध्यक्ष लायन्स अभय खोबरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आली. यावेळी सचिव शिरीष पंडित, खजिनदार विठ्ठल तेली, प्रभाकर मजगे,मल्लिनाथ साखरे,चंद्रकांत वेदपाठक,शदिद वळसंकर उपस्थित होते.
याप्रसंगी सचिव पंडित यांनी सेवा पंधरवड्यानिमित्त राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची माहिती दिली. कार्यक्रमात लायन्स क्लबच्या सर्व नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. शाळेतील अस्थिव्यंग व मतिमंद विद्यार्थी, शिक्षक व सर्व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुरेश भोसले यांनी केले, तर आभार प्रदर्शन मुख्याध्यापक फरदीन मुल्ला यांनी मानले.