आरोग्याच्या समस्याबाबत अनेक फळ महत्वाचे ठरत असताना आता पपईच्या पानांचा वापर प्लेटलेट्स वाढवण्यासाठी, त्वचेच्या समस्या कमी करण्यासाठी किंवा घरगुती उपचारांसाठी केला जात होता. मात्र, आता नव्या संशोधनातून समोर आले आहे की पपईची पाने कर्करोगासारख्या गंभीर आजारावरही प्रभावी ठरू शकतात.
काय सांगते संशोधन?
फ्लोरिडा विद्यापीठ तसेच अमेरिका व जपानमधील डॉक्टर आणि संशोधकांनी केलेल्या अभ्यासानुसार पपईच्या पानांमध्ये असे गुणधर्म आढळतात की ते कॅन्सरच्या पेशींची वाढ रोखतात आणि त्यांना नष्ट करतात.
पपईची पाने किमान 10 प्रकारच्या कॅन्सरवर परिणामकारक ठरू शकतात.
त्यात मुख्यतः
स्तनाचा कर्करोग
फुफ्फुसाचा कर्करोग
यकृताचा कर्करोग
स्वादुपिंडाचा कर्करोग
गर्भाशयाचा कर्करोग
पपईच्या पानांचा परिणाम कसा होतो?
पपईची पाने शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती बळकट करून कॅन्सरच्या पेशींवर हल्ला करतात.
त्यामध्ये असलेले पापेन एंजाइम्स कॅन्सर पेशींवरील प्रोटीन लेप तोडतात, ज्यामुळे त्या पेशी टिकू शकत नाहीत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे, या प्रक्रियेत सामान्य पेशींना हानी पोहोचत नाही, तर केमोथेरपीमध्ये रोगप्रतिकारक शक्ती दाबली जाते.
पपईच्या पानांचा चहा कसा बनवायचा?
- वाळवलेली पाने:
५–७ पाने उन्हात वाळवून तुकडे करा.
500 मि.ली. पाण्यात उकळून अर्धे शिल्लक राहेपर्यंत उकळा.
दिवसातून 2–3 वेळा 125 मि.ली. प्रमाणात प्या.
- ताजी पाने:
७ ताजी पाने हाताने मळून 1 लिटर पाण्यात उकळा.
पाणी 250 मि.ली. उरल्यावर गाळून 125 मि.ली. सकाळ-संध्याकाळ प्या.
चहा पिल्यानंतर अर्धा तास काहीही खाऊ-पिऊ नये.
किती दिवस घ्यावा?
संशोधनानुसार 5 आठवड्यांत परिणाम दिसू शकतो. तरीही तज्ञ 3 महिने हा चहा घेण्याची शिफारस करतात.
पपईच्या पानांचा हा उपाय नैसर्गिक व कोणतेही साइड इफेक्ट नसलेला मानला जातो. तरीही कोणताही घरगुती उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घेणे अत्यावश्यक आहे.