ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धनंजय मुंडे प्रकरणी शरद पवारांच्या भूमिकेमुळे महाराष्ट्राच्या जनतेचा भ्रमनिरास झाला

मुंबई  | धनंजय मुंडे यांच्यावर झालेले बलात्काराचा आरोप गंभीर आहेत, असे म्हणणाऱ्या शरद पवार यांनी २४ तासांत घुमजाव का केले?, असा सवाल करत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी आज पुन्हा एकदा मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे.

शरद पवार यांनी धनंजय मुंडे यांच्या प्रकरणी जी भूमिका घेतली आहे त्यामुळे महाराष्ट्रातील जनतेचा भ्रमनिरास झाला आहे असा आरोपही चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. शरद पवार यांनी नैतिकता पाळावी आणि सामजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांची चौकशी होईपर्यंत मुंडेंचा राजीनामा घ्यावा,” अशी मागणी चंद्रकांत पाटील यांनी केली.

“शरद पवारांनी धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर आहेत, असे म्हटलं होते. शरद पवार कडक धोरण स्वीकारतात. त्यांनी 50 वर्षाच्या जीवनात आरोप झाल्यानंतर त्या व्यक्तीला पाठीशी घातले असे झाले नाही, पण पवारांच्या कालच्या पत्रकार परिषदेने भ्रमनिरास झाला, पवारांनी घुमजाव का केलं हे कळलं नाही, असं पाटील म्हणाले. भारतीय राजकारणात अशी घटना घडल्यानंतर राजीनामा देण्याची कृती झालेली आहे. त्यामुळे धनंजय मुंडे यांनी राजीनामा द्यायला हवा,” असेही चंद्रकांत पाटील म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!