तुळजापूर : वृत्तसंस्था
सन २०२३ पासून संस्था तुळजापूर आणि लोहारा तालुक्यातील एकूण ३० गावांमध्ये निर्धार समानतेचा हा प्रकल्प राबवत आहे. स्विसएड आणि युरोपियन युनियनच्या सहाय्याने राबवण्यात येणाऱ्या या प्रकल्पाअंतर्गत लोहारा, तुळजापूर तालुक्यातील ३० गावांमधून लिंगभाव समानता, बालविवाह आणि स्त्रियांवरील हिंसेला प्रतिबंध, या करिता गावपातळीवर जाणीवजागृती, लक्ष गट व आधार गट सदस्य प्रशिक्षण, अभ्यास सहली, जोडपी स्वागत कार्यक्रम, समजदार जोडीदाराला प्रोत्साहन, जबाबदार पालकत्वाची जाणीवजागृती, सामुहिक कृती असे विविध उपक्रम राबविले जात आहेत. या प्रक्रियेचा भाग म्हणून दि. १० नोहेंबर २०२५ पासून शाळा, महाविद्यालय व गावकऱ्यांना सोबत घेऊन एक अभिनव अभियान राबवण्याचा संस्था नियोजन करत आहे.
हिंसामुक्त समाजासाठी पहाट समानतेची अभियान २०२५
हे अभियान शाळांमधील किशोरवयीन मुलं-मुली आणि तरुणाई यांच्यासह गावकऱ्यांसोबत संवाद साधेल. अभियानामध्ये विविध मनोरंजक कार्यक्रम, चर्चा सत्र, व्यक्त्यांचे मार्गदर्शन, रॅली, गट चर्चा, पथनाट्य, पोस्टर प्रदर्शन आयोजित केले जाणार आहेत. युवा पिढीतील ताण-तणाव ओळखून त्यातून सकारात्मक दिशा शोधण्यासाठी आणि स्त्रियांवरील हिंसेला व बालविवाह प्रथेला विरोध करण्यासाठी त्यांना हे अभियान सक्षम बनवण्याचा प्रयत्न करेल.
या अभियानाचे उदघाटन दि. १० नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वा. चिकुंद्रा ता. तुळजापूर येथून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, संभाजीनगर येथील सेवानिवृत्त समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. स्मिता अवचार, लेखक व जेष्ठ पत्रकार रविंद्र केसकर, हॅलोचे विश्वस्थ डॉ. क्रांती रायमाने, नीना निकाळजे यांच्यासह प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. हे अभियान १० नोव्हेंबर ते १८ नोव्हेंबर या काळात लोहारा व तुळजापूर तालुक्यातील चव्हाणवाडी, दिंडेगाव, हगलूर, मानेवाडी मानमोडी, अलियाबाद, चिकुंद्रा, बसवंतवाडी, बोरनदीवाडी तीर्थ खुर्द, वडगाव देव, वडगाव लाख, होनाळा, मे. जवळगा , वि. पांढरी, फनेपूर, उंडरगाव, मोघा खुर्द, माळेगाव, वाणेगाव, उदतपूर, तोरंबा, मुर्शद्पूर,काटे चिंचोली, रेबे चिंचोली, कोंडजीगड, तावशीगड, सालेगाव, करजगाव, राजेगाव आदी गावातील विविध पातळ्यांवर युवक, युवती, शालेय विद्यार्थी ग्रामस्थांसोबत संवाद साधणार आहे.
संस्थेच्या अध्यक्षा डॉ. शुभांगी अहंकारी, विश्वस्थ डॉ. क्रांती रायमाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकल्प समन्वयक बसवराज नरे, सहा. समन्वयक सतीश कदम, सहा. समन्वयक स्वाती पाटील, समुपदेशिका वासंती मुळे, पर्यवेक्षक इंदुबाई कबाडे, ज्ञानेश्वर जाधव, प्रणिता भोसले, सोपान सुरवसे, पल्लवी साळुंके, बालाजी चव्हाण , दिनकर गाढवे, नूतन गायकवाड यांच्या सह ३० गावातील प्रेरक, प्रेरिका लक्षगट सदस्य, आधार गट सदस्य या अभियान यशस्वीते साठी परिश्रम घेत आहेत.