ध्यास विश्वसार्ह बातमीचा

वाहनधारकांसाठी मोठी बातमी : एचएसआरपी ‎‎प्लेटसाठी उद्या शेवटची मुदत !

छत्रपती संभाजीनगर : वृत्तसंस्था

राज्यातील वाहनधारकांसाठी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हाय सिक्युरिटी नंबर प्लेट’ ‎‎(एचएसआरपी) बसवण्यासाठी आतापर्यंत ८ लाख ‎‎वाहनांपैकी ३ लाख ५४ हजार ७०१ वाहनधारकांनी ‎‎प्लेटसाठी ऑनलाइन बुकिंग केली आहे. त्यातील २‎लाख ९८ हजार ६४१ वाहनधारकांनी नंबर प्लेट बसवली ‎‎आहे. बुकिंग केलेल्यापैकी ५६ हजार वाहनधारकांना‎प्लेट बसवण्याचे काम सुरू आहे. नंबर प्लेट बसवण्याची ‎‎मुदत ३० नोव्हेंबर रोजी संपणार आहे. अद्याप ५ लाख ‎‎वाहनांना नंबर प्लेट बसवण्याचे आव्हान आहे.‎

देशभरात एकाच स्वरूपाच्या वाहनांना नंबर प्लेट ‎‎असाव्यात, यासाठी हा निर्णय घेतला आहे. सर्व‎प्रकारच्या वाहनांना नवीन सुधारित, अद्ययावत नेमप्लेट ‎‎बसवावी लागणार आहे. त्यासाठी आरटीओ कार्यालयाने ‎‎एजन्सी नेमली आहे. हाय सेक्युरिटी नंबर प्लेट‎बसवण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यासाठी ३१ मार्च २०२५‎ही मुदत दिली होती. मात्र, त्याला वाहनधारकांचा अल्प ‎‎प्रतिसाद असल्याने ३ वेळा मुदतवाढ दिली आहे.‎

यापूर्वी ३ वेळा मुदतवाढ ‎दिल्यानंतरही नंबर प्लेट बदलणे ‎बाकी असलेल्या वाहनांची संख्या ‎मोठी आहे. या सर्व वाहनांवर ‎कारवाई करणे शक्य नाही.‎ त्यामुळे नागरिकांच्या रोषाला‎ सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे ‎नव्या नंबर प्लेट लावण्यासाठी ‎सरकार पुन्हा एकदा मुदतवाढ देऊ‎ शकते. सध्या यासंदर्भात ‎सरकारकडून काही स्पष्ट केलेले ‎नसले, तरी लवकरच ‎प्रशासनाकडून दिशानिर्देश जारी‎केले जातील, असे मानले जाते.‎

तीन वेळा मुदतवाढ‎
पहिल्यांदा ‎: ३०‎ एप्रिल‎ २०२५‎
दुसऱ्यांदा : ‎१५‎ ऑगस्ट‎ २०२५‎
तिसऱ्यांदा :‎ ३०‎ नोव्हेंबर‎ २०२५‎

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!