---Advertisement---

सामाजिक न्यायमंत्री मुंडेंच्या पत्नी राजश्री मुंडे अक्कलकोटच्या स्वामी चरणी

On: January 22, 2021 4:28 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट- आपल्याला माहिती आहे की सध्या सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या संदर्भातील बातमीने राज्यात वादळ उठले आहे.त्यात आज मुंडे यांच्या विरोधात झालेली तक्रार ही मागे घेण्यात आली आहे.

या पार्श्वभूमीवर मुंडे यांच्या पत्नी राजश्री मुंडे या अक्कलकोटला आले आहेत.मुंडे यांनी येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर मंदीर समितीचे चेअरमन  महेश इंगळे यांनी त्यांचा श्री स्वामी समर्थाचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देवून यथोचित सत्कार केला. यावेळी बोलताना राजश्री मुंडे यांनी विचलीत होणाऱ्या मानवाचे मन एकाग्र होण्याकरीता स्वामींच्या नामस्मरणाचा लाभ नेहमीच होत असतो.

त्यामुळे माझ्या जीवनात स्वामी दर्शनास व त्यांच्या नामस्मरणास विशेष महत्व असल्याचे मनोगत व्यक्त केले. यावेळी मंदीर समितीचे सचिव ए.एम. घाटगे,  विश्वस्त महेश गोगी, श्रीशैल गवंडी, संजय पवार, विपूल जाधव, सागर गोंडाळ, अविनाश क्षीरसागर, गिरीश पवार इत्यादी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!