ध्यास विश्वसार्ह बातमीचा

या नामांकित बँकेत कोट्यवधींचा घोटाळा; तुमचे पैसे सुरक्षित आहेत का?

मुंबई वृत्तसंस्था : लोकांची आयुष्यभराची कमाई सुरक्षित ठेवण्याचे स्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बँकेतच मोठा आर्थिक घोटाळा उघडकीस आला आहे. देशातील प्रमुख राष्ट्रीयकृत बँक असलेल्या पंजाब नॅशनल बँकेत (PNB) तब्बल 2,434 कोटी रुपयांचा कर्ज घोटाळा झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणाची माहिती स्वतः बँकेनेच अधिकृतपणे दिल्याने बँकिंग क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे.

पीएनबीने 26 डिसेंबर रोजी भांडवली बाजार बंद झाल्यानंतर केलेल्या रेग्युलेटरी फायलिंगमध्ये या घोटाळ्याची माहिती दिली. त्यानंतर शुक्रवारी (27 डिसेंबर) बँकेच्या शेअरमध्ये सुमारे अर्ध्या टक्क्यांची घसरण पाहायला मिळाली. या प्रकरणाची माहिती रिझर्व्ह बँक ऑफ इंडियालाही (RBI) देण्यात आली आहे.

बँकेच्या माहितीनुसार हा घोटाळा एसआरईआय इक्विपमेंट फायनान्स लिमिटेड (SEFL) आणि एसआरईआय इन्फ्रास्ट्रक्चर फायनान्स लिमिटेड (SIFL) या दोन कंपन्यांशी संबंधित आहे. यामध्ये SEFL कडून 1,240.94 कोटी रुपये, तर SIFL कडून 1,193.06 कोटी रुपयांची थकबाकी आहे. या दोन्ही कंपन्यांना पीएनबीने कर्ज दिले होते, मात्र अद्याप त्याची परतफेड झालेली नाही.

पीएनबीने स्पष्ट केले आहे की, या संपूर्ण थकित कर्जावर 100 टक्के प्रोव्हिजनिंग करण्यात आली असून ही प्रक्रिया कॉर्पोरेट दिवाळखोरी निराकरण प्रक्रियेअंतर्गत पूर्ण करण्यात आली आहे. तरीही, एवढ्या मोठ्या रकमेच्या घोटाळ्यामुळे पुन्हा एकदा बँकिंग व्यवस्थेच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!