मेष राशी
आज तुम्ही तुमचा बहुतेक वेळ तुमच्या मुलांसोबत घालवाल. तुम्ही त्यांच्यासोबत मॉलमध्ये खरेदीलाही जाऊ शकता. घरी अचानक नातेवाईक येण्याची शक्यता आहे.
वृषभ राशी
तुम्ही मित्रांसोबत बाहेर जाऊ शकता. आज तुमचा व्यवसाय दुप्पट होईल, ज्यामुळे आर्थिक परिस्थिती सुधारेल.
मिथुन राशी
दुकानदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर असेल. चांगले उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. संगीत क्षेत्रात काम करणाऱ्यांना आज चित्रपट उद्योगात गाण्याची ऑफर मिळू शकते.
कर्क राशी
तुमच्या जोडीदाराला खूश करण्यासाठी तुम्ही बाहेर फिरायला जायचा प्लान आखू शकता. तुमच्या वरिष्ठांशी शक्य तितकी सल्लामसलत केल्यानंतरच आज कोणतेही काम सुरू करा; यश निश्चित मिळेल. ऑफीसमध्ये जाणाऱ्यांनी जपून वागा.
सिंह राशी
आज तुम्ही अनेक महत्त्वाचे निर्णय घ्याल. या राशीत जन्मलेल्या व्यावसायिकांसाठी हा दिवस शुभ आहे. तुमच्या ऑफिसमध्ये गणेशमूर्ती ठेवल्याने तुम्हाला मोठा करार मिळू शकतो.
कन्या राशी
आज तुम्ही कामासाठी नवीन योजना आखायचा प्रयत्न कराल. पण तुम्हाला त्यात यश मिळू शकते. तुमच्या प्रामाणिकपणामुळे तुम्हाला तुमच्या जोडीदाराचा आणि कुटुंबाचा प्रेम मिळेल.
तूळ राशी
तुमच्या मैत्रीपूर्ण वागण्यामुळे तुम्हाला यश मिळू शकते. तुम्हाला उत्सुकतेची भावना देखील वाटू शकते. तुम्ही इतरांची मदत कराल, समाधान मिळेल.
वृश्चिक राशी
तुमचे अडकलेले काम आज पूर्ण होईल. सरकारी कार्यालयात काम करणाऱ्यांना पदोन्नती मिळू शकते. व्यवसायासाठी तुम्ही परदेशातही प्रवास करू शकता
धनु राशी
आज अनुभवी लोकांसोबत राहून तुम्हाला खूप काही शिकायला मिळेल. या राशीच्या महिला आज घरी कीर्तनाचे आयोजन देखील करू शकतात. तुमच्या शेजाऱ्यांसोबत मंदिरात दर्शनासाठी जाल.
मकर राशी
आज तुम्ही जे काम हाती घ्याल ते पूर्ण जबाबदारीने करा. आज बरेच लोक तुमची मदत घेऊ शकतात. पण त्यात तुमच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.
कुंभ राशी
या राशीच्या लोकांना व्यवसाय वाढीसाठी नवीन मार्ग सापडतील. आज काळजीपूर्वक वाहन चालवा, अपघात होऊ शकतो. तुमच्या जोडीदाराच्या माहेरून चांगली बातमी येऊ शकते.
मीन राशी
आज तुमचे काम एकाग्रतेने करा आणि अर्धवट सोडू नका. तुमच्या मेहनतीचे योग्य फळ देखील तुम्हाला मिळेल. जमीन किंवा वाहन खरेदीशी संबंधित काम होऊ शकतं.