---Advertisement---

धक्कादायक : अल्पवयीन मुलीसोबत चुकीचे कृत्य : वकिलांसह ३ अटकेत !

By team
On: February 5, 2026 10:06 AM
Follow Us:
---Advertisement---

सोलापूर : वृत्तसंस्था

जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १६ वर्षीय विद्यार्थिनीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अश्लील फोटो व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केले. नंतर या पीडितेला धर्मांतर करायला लावून तिच्याशी लग्नही केले. उपाशी ठेवून मारहाण केली. या प्रकरणी सदर बझार पोलिसांत ५ जणांवर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. संशयितांपैकी एका वकिलासह तिघांना अटक करण्यात आली आहे. तर त्यांचे दोन साथीदार फरार आहेत.

इस्राईल अहमद शेख (२४, रा. कुर्बान हुसेननगर) असे मुख्य संशयिताचे नाव आहे. त्याला न्यायालयाने ९ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. तर उजेब ऊर्फ हनीफ सादिक शेख (२३), ॲड. अब्दुल्लाह सलीम खतीब (२९) या दोघांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. फिरोज व त्याची आई फरार आहेत.

संशयित इस्राईल शेख हा तिचा सतत पाठलाग करत होता. डिसेंबर २०२४ मध्ये त्याने पीडितेचे काही फोटो व व्हिडिओ मिळवले आणि ते व्हायरल करण्याची धमकी दिली. याआधारे ब्लॅकमेल करत मित्र उजेब शेखच्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केले. पीडितेचे कुटुंब वास्तव्यास दुसऱ्या ठिकाणी गेले असता, तिथेही तिच्यावर अत्याचार केला.

डिसेंबर २०२५ मध्ये संशयिताने पीडितेला लग्नाचे आमिष दाखवून तिला शहर काझी कार्यालयात नेले. तिथे ॲड. अब्दुल्लाह खतीब याने तिला लग्नासाठी धर्मांतर करणे अनिवार्य असल्याचे सांगून काही कागदपत्रांवर सह्या घेतल्या. त्यानंतर तिला जबरदस्तीने गुलबर्गा (कर्नाटक) येथे नेऊन ठेवण्यात आले. तिथे आरोपी इस्राईलचा आतेभाऊ फिरोज आणि त्याच्या आईने पीडितेवर दबाव टाकून तिला उपाशी ठेवून मारहाण केली, असे पीडित मुलीने तक्रारीत नमूद केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!