---Advertisement---

…तर कोश्यारींच्या पुरस्काराला विरोध करा; मंत्री शिवेंद्रराजेंना काँग्रेसचे थेट आव्हान !

By team
On: February 7, 2026 4:32 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई | प्रतिनिधी

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी प्रचारसभेत केलेल्या वक्तव्यावरून महाराष्ट्रातील राजकारण तापले असून, काँग्रेसने त्यांना थेट आव्हान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचा कथित अपमान करणारे माजी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना दिल्या जाणाऱ्या पुरस्काराला विरोध करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.

एका प्रचारसभेत बोलताना शिवेंद्रराजे भोसले म्हणाले होते की, “गरज नसताना कुणी माझ्या नादाला लागले तर मी सुद्धा छत्रपतींची औलाद आहे, हे लक्षात ठेवा. वेळ आली तर कुणालाच सोडणार नाही.” त्यांच्या या वक्तव्याचा संदर्भ देत काँग्रेसने सोशल मीडियावरील पोस्टद्वारे जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने म्हटले आहे की, “आ. शिवेंद्रराजे जी, आपल्यातील ‘छत्रपतींची औलाद’ विकृत कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला तेव्हा जागी झाली असती, तर तमाम शिवप्रेमींना बरं वाटलं असतं.” काँग्रेसने पुढे भाजप व संघाशी संबंधित विविध नेत्यांच्या वक्तव्यांचा उल्लेख करत, त्या वेळी शिवेंद्रराजेंनी भूमिका न घेतल्याचा आरोप केला आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करणारे भगतसिंह कोश्यारी, प्रशांत कोरटकर, सुधांशू त्रिवेदी, मंगलप्रसाद लोढा आणि विनोद तावडे यांचा उल्लेख करत काँग्रेसने या सर्व घटनांवर शिवेंद्रराजेंनी मौन बाळगल्याचा आरोप केला आहे. “तुम्ही खरेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील असाल आणि तुमचा स्वाभिमान भाजपच्या चरणी अर्पण केला नसेल, तर कोश्यारी यांच्या पुरस्काराला विरोध करा. तसेच छत्रपतींचा अपमान करणाऱ्या सर्व संघ-भाजप नेत्यांचा उघड विरोध करा,” असे आवाहन काँग्रेसने केले आहे. या टीकेमुळे राज्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची चिन्हे असून, शिवेंद्रराजे भोसले या आरोपांना काय प्रत्युत्तर देतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!