---Advertisement---

१५ दिवसांत सोनं २३ हजारांनी, चांदी १.३८ लाखांनी घसरली

By team
On: February 8, 2026 10:28 AM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव :  वृत्तसंस्था

शहरातील सुवर्ण बाजारात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दरवाढीच्या मालिकेला अखेर ब्रेक लागला असून, गेल्या आठवड्यापासून सोने व चांदीचे दर विक्रमी पातळीच्या खालीच आहेत. गेल्या पंधरा दिवसांच्या तुलनेत सोने २३ हजार रुपये, तर चांदी १ लाख ३८ हजार रुपयांनी स्वस्त झाले आहे. त्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांना दिलासा मिळाला असला, तरी चढ्याभावात गुंतवणूक केलेल्यांमध्ये मात्र चिंतेचे वातावरण आहे.

सध्या आंतरराष्ट्रीय पातळीवरील अनिश्चितता कमी झाल्याचे संकेत मिळत असल्यामुळे सोने व चांदीच्या भावात दिवसागनिक होणाऱ्या वाढीला आळा बसला आहे. कारण आंतरराष्टीय अस्थिरता वाढल्यास सोन्याकडे सुरक्षित गुंतवणूक म्हणून पाहिले जाते. त्यावेळी सोन्याच्या भावात अचानक वाढ पाहवसाय मिळते. जानेवारीत शेवटच्या आठवड्यात सोने व चांदी या मौल्यवान धातूंनी उच्चांक गाठला होता. मात्र, सध्या जागतिक बाजारपेठेत काही प्रमाणात स्थिरता येऊ लागल्याने सोन्याची मागणी घटली असून, त्याचा थेट परिणाम दरांवर झाला आहे. गेल्या पंधरा दिवसांपूर्वी जळगाव शहरातील सुवर्ण बाजारात २४ कॅरेट सोन्याच्या दर प्रति १० ग्रॅम दर १ लाख ८२ हजार ८२५ रुपये (जीएसटीसह) इतक्या उच्चांकावर पोहोचले होते. मात्र, शनिवारी दि. ७ रोजी सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ५९ हजार ५४७ रुपयांवर स्थिरावले आहेत. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत सोन्याच्या दरात २३ हजार २७८ रुपयांनी घसरले आहेत.

चांदीच्या किमतींमध्येही अशीच मोठी घसरण पाहायला मिळाली. गेल्या आठवड्यापर्यंत चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो ४ लाख ६ हजार ८५० रुपये इतक्या उच्चांकावर पोहोचला होता. त्यात आता मोठी घसरण झाली असून, शनिवारी दि. ७ रोजी सकाळी बाजार उघडल्यावर चांदीचा दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ६८ हजार ८३० रुपये इतका होता. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसांत चांदी तब्बल १ लाख ३८ हजार रुपयांनी स्वस्त झाली आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!