---Advertisement---

गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडले होते ; रोहित पवार !

By team
On: February 12, 2026 2:19 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : वृत्तसंस्था

राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेते रोहित पवार यांनी गुरुवारी महत्त्वाच्या विधानांचा ऐलावा दिला. त्यांनी सांगितले की, नरेश अरोरांना कॉन्ट्रॅक्ट मिळायला हवा, अशी काहींची भूमिका होती; मात्र अजित पवार यांच्या कॉन्ट्रॅक्ट संदर्भातील भूमिका वेगळी होती. रोहित पवार यांनी स्पष्ट केले की, त्यांनी कुठेही खोटं बोललेले नाही.

त्यांनी दादांच्या अपघातावरही चिंता व्यक्त केली. “गेल्या चार महिन्यापासून दादा एकटे पडल्यासारखे दिसत होते. देशपातळीवर आणि राज्यपातळीवर लोक त्यांच्यासोबत नव्हते, फक्त काही मोजके आमदार दादांसोबत होते. हा अपघात आहे की घातपात? हाच एक महत्वाचा मुद्दा आहे,” असे रोहित पवार यांनी म्हटले.

राष्ट्रवादी काँग्रेसचा एनडीएसोबत सहभाग होणार का, याबाबत विचारलेल्या प्रश्नाला त्यांनी उत्तर देणे पुढे ढकलले आणि सोमवारी किंवा मंगळवारी मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट करणार असल्याचे सांगितले. “आम्हाला सत्तेत जायचे असते, तर ते आधीच झाले असते; पण आम्ही विचारासाठी आणि संघर्षासाठी पुढे आलो आहोत,” असेही त्यांनी नमूद केले.

त्यांनी सांगितले की, सुनेत्रा पवार, पार्थ पवार आणि जय पवार यांनी मोदी आणि अमित शहांना भेटून अजित पवारांच्या अपघाताचे कारण समोर आणण्याची मागणी केली असेल, असे त्यांचे मत आहे. रोहित पवार यांनी अधिवेशनाच्या व्यस्ततेमुळे थेट भेट न झाल्याचे सांगितले, पण मेलद्वारे आपले प्रश्न ते संबंधित नेत्यांना मांडणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार यांनी पुन्हा एकदा मागणी केली की, दादांच्या अपघाताची चौकशी लवकरात लवकर व्हावी, आणि या प्रकरणातील सर्व घटना स्पष्ट व्हाव्यात.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!