---Advertisement---

राज्यातील ८ गावांना भूकंपाचे जोरदार धक्के !

By team
On: February 13, 2026 2:40 PM
Follow Us:
---Advertisement---

पुणे : वृत्तसंस्था

मराठवाड्यातील नांदेड जिल्ह्यात आज दुपारी सौम्य भूकंपाचे धक्के जाणवल्याने नागरिकांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले. मुखेड तालुक्यातील 7 ते 8 गावांमध्ये सुमारे दुपारी 3 वाजून 15 मिनिटांनी जमिनीतून गूढ आवाज आला आणि जमीन हलल्याचा अनुभव ग्रामस्थांनी घेतला.

हिबट, कोळगाव, धामणगाव, मोटरगा, जामखेड, धनज आदी गावांमध्ये नागरिकांनी अचानक झालेल्या आवाजामुळे घराबाहेर धाव घेऊन मोकळ्या जागेत आश्रय घेतला. राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राच्या माहितीनुसार, या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर 3.0 इतकी नोंदवली गेली आहे. मुखेड तालुक्यातील खपराळा परिसर हा भूकंपाचा केंद्रबिंदू असल्याचे सांगितले जाते. सुदैवाने कोणतीही जीवित किंवा आर्थिक नुकसान झाल्याची माहिती नाही.

तज्ज्ञांच्या मते, जमिनीखालील खडकांच्या थरांमध्ये ताण साचल्यामुळे किंवा त्यांच्या हालचालीमुळे अचानक ऊर्जा मुक्त होते आणि त्यातून सौम्य कंपने निर्माण होतात. काहीवेळा पावसाळ्यात पाणी खोल भेगांमधून आत शिरते आणि तापलेल्या खडकांच्या संपर्कात येऊन वाफ तयार होते. हा दाब अचानक सुटल्यास गडगडाटासह आवाज ऐकू येतो. तसेच जमिनीखालील नैसर्गिक पोकळ्यांमध्ये अडकलेली हवा बाहेर पडताना देखील अशा प्रकारचा आवाज निर्माण होतो. समान प्रकारच्या घटना काही दिवसांपूर्वी पालघर आणि जानेवारीत पंढरपूर परिसरातही घडल्या होत्या. 3.0 तीव्रतेचा भूकंप सौम्य स्वरूपाचा असतो, परंतु अशा घटना वारंवार घडल्यास प्रशासनाने सतर्क राहावे आणि नागरिकांना योग्य मार्गदर्शन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!