---Advertisement---

मोदी–मॅक्रोन मुंबईत; उद्योगजगतासोबत राऊंडटेबल, मुंबईत कडक बंदोबस्त

By team
On: February 17, 2026 10:24 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : प्रतिनिधी

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे १७ फेब्रुवारी रोजी एक दिवसाच्या दौऱ्यावर मुंबईत येत आहेत. दुपारी २.१५ वाजता त्यांचे आगमन होणार आहे. या दौऱ्यात फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन हेही सहभागी होणार आहेत.

दुपारी २.३० वाजता लोकभवन (पूर्वीचे राजभवन) येथे पंतप्रधान मोदी आणि राष्ट्राध्यक्ष मॅक्रोन यांच्यात द्विपक्षीय बैठक होणार आहे. विविध क्षेत्रांतील सहकार्याबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित आहे. त्यानंतर सायंकाळी ५ वाजता हॉटेल ताज येथे दोन्ही नेते विविध कंपन्यांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांसोबत राऊंडटेबल चर्चेत सहभागी होणार आहेत.

सायंकाळी ६.३० वाजता गेटवे ऑफ इंडिया येथे इंडो–फ्रान्स सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. भारत–फ्रान्स ‘इयर ऑफ इनोव्हेशन’ उपक्रमांतर्गत हा कार्यक्रम होत असून १४ ते २२ फेब्रुवारीदरम्यान विविध उपक्रम राबवले जात आहेत. दरम्यान, या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर दक्षिण मुंबईतील वाहतुकीत तात्पुरते बदल करण्यात आले आहेत. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी २ ते रात्री ९ वाजेपर्यंत विशेष वाहतूक व्यवस्था लागू राहणार आहे.

छत्रपती शिवाजी महाराज मार्ग आणि श्यामाप्रसाद मुखर्जी चौक हे मार्ग पूर्णपणे बंद राहतील. तसेच नॉर्थ कोर्ट ते अॅडम स्ट्रीट जंक्शनदरम्यानचा पी. रामचंदानी मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात येणार आहे. रिगल जंक्शनकडे येणारी वाहने शहीद भगतसिंग मार्ग, महाकवी भूषण रोड आणि बी. के. बोमन बेहराम रोडकडे वळवण्यात येतील. तसेच काही टॅक्सी स्टँड व बेस्ट बस थांबे तात्पुरते बंद राहणार असल्याने नागरिकांनी पर्यायी मार्गांचा वापर करावा, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!