ध्यास विश्वसार्ह बातमीचा

सोन्याच्या भावात मोठी घसरण, तपासा आजचे नवीन दर

नवी दिल्ली । आज सोन्या-चांदीचे भावात मोठी घसरण झाली आहे. आज सोन्याच्या भावात २५० घसरण झाली आहे. या घसरणीनंतर सोन्याचा भाव ४९ हजारांखाली आला आहे.

सध्या मल्टी कमॉडिटी बाजारात सोने २३५ रुपयांनी घसरले आहे. सोन्याचा भाव दहा ग्रॅमला ४८९०८ रुपये झाला आहे. तसेच चांदीला देखील नफेखोरीची झळ बसली आहे. एक किलो चांदीचा भाव ६६२९७ रुपये झाला आहे. त्यात २३८ रुपयांची घट झाली आहे. सकाळी एमसीएक्स उघडताच सोने आणि चांदीमध्ये घसरण झाली. त्याआधीच्या सत्रात सोमवारी कमॉडिटी बाजारात सोने घसरले होते.

good returns या वेबसाईटनुसार आज बुधवारी मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८३३० रुपये झाला आहे तर २४ कॅरेट सोन्याचा भाव ४९३३० रुपये झाला आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोन्याचा भाव ४७९०० रुपये आहे. २४ कॅरेटसाठी तो ५२२५० रुपयांवर कायम आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४६२१० रुपये असून २४ कॅरेटचा भाव ५०६१० रुपये आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ४८४९० रुपये असून २४ कॅरेट सोन्याचा भाव ५११९० रुपये आहे.

सन 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत सोन्याच्या किंमतीत वाढ दिसून येते. तज्ञांच्या मते, यावर्षी सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 63000 रुपयांपर्यंत पोहोचू शकते. यावर्षी सोन्याचे दर कायम राहू शकतात. सन 2020 मध्ये सोन्यात बरीच ताकद होती.

 

एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक तपन पटेल यांच्या म्हणण्यानुसार, 2021 मध्ये सोन्याच्या किंमतीत मोठी वाढ होईल. जागतिक आर्थिक रिकव्हरीची चिंता पाहता बाजारपेठेतील तज्ज्ञ असा अंदाज लावत आहेत की, यावर्षी कॉमेक्सवर सोन्याचे टार्गेट 2,150 आणि प्रति औंस 2,390 डॉलर आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!