---Advertisement---

अक्कलकोट येथे माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रेंच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन

On: January 27, 2021 2:15 PM
Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट- महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा अक्कलकोट व श्रीमंत शहाजी राजे भोसले वाचनालय अक्कलकोट यांच्या संयुक्त विद्यमाने वाचनालयाच्या सभागृहात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा निमित्त ग्रंथ प्रदर्शन आयोजीत करण्यात आले होते. या ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन माजी मंत्री सिध्दाराम म्हेत्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.

या प्रसंगी बोलतांना म्हेत्रे म्हणाले मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न केले पाहिजेत. जास्तीत जास्त मराठी भाषेचा वापर आपण दैनंदिन जीवनात केला पाहिजे. तरच खऱ्या अर्थाने मराठी भाषेचे संवर्धन होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव होत्या. या प्रसंगी सचिव शिरिष  सुभेदार, अॅड. प्रशांत शहा, सौ.पुष्पा हरवाळकर, प्रा.भिमराव साठे, ग्रंथपाल दत्तात्रय बाबर, बाबासाहेब पाटील, नबीलाल शेख, भिमाशंकर कापसे, विलास गव्हाणे, दिनकर शिंपी, किरण जाधव, यश जाधव, सौ.स्नेहा नरके, महादेव शिरसाठे आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!