जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे – अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी
दुधनी : जंगम समाज बांधव सामाजिक, राजकीय आणि आर्थिक दृष्टीने सदृढ होणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन मादन हिप्परगा मठाचे मठाधीपती अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी यांनी केले. दुधनी येथील विरक्त मठात आयोजीत कार्यक्रमात ते बोलत होते.
अक्क्लकोट तालुक्यातील दुधनी येथील श्री जंगम समाज बहुद्देशीय संस्थेच्यावतीने येथील विरक्त मठात २०२१सालच्या दिनदर्शिका प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आले होते. दुधनी विरक्त मठाचे मठाधीपती डॉ. शांतलिंगेश्वर महास्वमीजी या मार्गदर्शनाखाली सोलापूर जिल्हा जंगम समाजाचे जिल्हाध्यक्ष राजशेखर कंदलगाव यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मादन हिप्परगा मठाचे मठाधीपती अभिनव शिवलिंगेश्वर महास्वामीजी हे होते.
यावेळी दुधनी विरक्त मठाचे विश्वस्त सिद्धाराम येगदी, सुभाष परमशेट्टी, श्री जंगम समाज बहुद्देशीय संस्थेचे अध्यक्ष मल्लया हिरेमठ, उपाध्यक्ष गुरुशांत मठपती, कल्लय्य बाहेरमठ, गदगय्या मठपती, संगय्या शास्त्री मैंदर्गी, महानिंगय्या बाहेरमठ, इरय्या पुराणिक, आंनद बाहेरमठसह श्री जंगम समाज बहुद्देशीय संस्थेचे सर्व सद्स्य आणि दुधनीतील इतर नागरीक उपस्थित होते.