ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट येथील स्वयंपाक करणाऱ्या कामगार महिलेकडून श्रीराम मंदिरासाठी 10 हजार रुपयांची देणगी

अक्कलकोट : येथील जोशी भोजनालय येथे गेल्या अनेक वर्षांपासून स्वयंपाकाचे काम करणाऱ्या व गरिबीत जीवन जगणाऱ्या श्रीमती विमल बाळू शहापूरकर (गवळी) वय ७७ रा. अक्कलकोट यांनी अयोध्या येथील श्री राम जन्मभूमी मंदिर निर्माण कार्यासाठी रुपये दहा हजाराचा स्वेच्छा निधी देवून भक्ति व इच्छाशक्तीचे ज्वलंत उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे.

श्रीमती विमल गवळी ह्या गेली अनेक वर्षापासून जोशी भोजनालय येथे स्वयंपाकाचे काम करत आहेत. गरीब असणाऱ्या श्रीमती विमल शहापूरकर गवळी यांनी आतापर्यंत बचत केलेल्या पैशातून अयोध्या येथील श्रीरामाच्या मंदिर निर्माण कार्यासाठी रुपये दहा हजारचा स्वेच्छा निधी देऊन सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केलेला आहे. श्रीराम जन्मभूमिच्या ठिकाणी श्रीरामाचे भव्य मंदिर उभे राहणार असल्याचे समजल्यावर त्यांनी जोशी भोजनालयाचे मालक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रवींद्र जोशी यांना श्रीराम मंदिरसाठी स्वेच्छा निधी देण्याची इच्छा व्यक्त केली. त्यांची इच्छा व भक्तीचे कौतुक करीत रवींद्र जोशी यांनी श्रीराम मंदिर निर्माण निधी संकलनाचे तालुका मोठा निधी प्रमुख चेतन जाधव यांच्याशी संपर्क साधून ही माहिती दिली. मोठा नीती प्रमुख असलेले चेतन जाधव यांनी त्वरित संघाचे सर्व स्वयंसेवक घेऊन जोशी भोजनालय येथे गेले त्या ठिकाणी श्रीमती विमल गवळी यांनी रुपये दहा हजार रोख स्वरूपात निधी दिला.

स्वेच्छा निधी दिल्यानंतर त्यांना निधीची पावती व श्री रामाचा फोटो देण्यात आला. निधीची पावती देताना तालुका निधी प्रमुख चेतन जाधव,संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक रवींद्र जोशी,माजी तालुका कार्यवाह सुनील गुमास्ते,धर्मजागरणचे जिल्हा सहप्रमुख प्रसाद हारकुड,तालुका कार्यवाह चंद्रकांत जकापुरे,सहकार्यवाह सुशील हिरस्कर,जिल्हा बौद्धिक प्रमुख संतोष वगाले,अक्कलकोट उपखंड प्रमुख शिवशरण इचगे,अभाविप चे शिवशंकर स्वामी,तालुका बौद्धिक प्रमुख आदित्य जोशी,माधव बादोलेकर-कुलकर्णी,बाबु समाने, शिवशंकर स्वामी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!