मुंबई – वीजदराच्या बाबतीत राज्य सरकारने फार महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. शेतकऱ्यांच्या 45 हजार कोटींच्या थकबाकीपैकी शेतकऱ्यांना केवळ 15 हजार कोटी भरावे लागणार आहेत. विलंब चार्ज व व्याज हे माफ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माध्यमांशी बोलताना दिली.
पुढे ते म्हणाले की, राज्यातील महावितरण, महापारिक्षण, महानिर्मिती या तीनही कंपन्या अडचणीत असतानादेखील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करण्याची भूमिका महाविकास आघाडी सरकारची आहे. केवळ विरोधाकरता विरोधक आंदोलन करत आहेत, असे मत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडले.