---Advertisement---

नरहरी झिरवाळ विधानसभेचे हंगामी अध्यक्ष

On: February 4, 2021 5:59 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : काँग्रेस नेते नाना पटोले यांनी विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राज्यातील काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाच्या शर्यतीमध्ये नाना पटोले यांचे नाव आघाडीवर असल्यामुळे त्यांनी आपल्या पदाचा राजीमाना दिला असल्याची माहिती आहे.

दरम्यान, आता नव्या विधानसभा अध्यक्षांची नेमणूक होईपर्यंत विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ हेच विधानसभेचे हंगामी अध्यक्ष असतील. नरहरी झिरवाळ हे नाशिकमधील दिंडोरीचे आमदार आहेत. अजित पवार यांनी देवेंद्र फडणवीसांच्या साथीने उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली, त्यावेळी झिरवाळ बेपत्ता झाले होते. काही दिवसांनंतर नरहरी झिरवाळ शरद पवार यांच्या दिल्लीतील 6 जनपथ या निवासस्थानी दिसले, तेव्हा ‘माझी छाती फाडली तरी पवारसाहेब दिसतील’ असं भावनिक उत्तर देऊन झिरवाळ यांनी त्यांच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्यांची तोंडं बंद केली होती.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!