ध्यास विश्वसार्ह बातमीचा

… अशी असेल स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेची प्रक्रिया !

 

मारुती बावडे

अक्कलकोट, दि.१६ : अक्कलकोट श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या प्रयत्नातून
रोज अनेक लोकाभिमुख निर्णय घेत आहेत.भाविकांची मागणी लक्षात घेऊन आता राज्यभरातील भाविकांसाठी ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवाही सुरू केली आहे.
सध्या जगात सर्वत्र चालू असलेल्या कोरोना महामारी मुळे आणि स्वामीभक्तांच्या वाढत्या गर्दीकडे पाहून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट कडून महाप्रसादास येणाऱ्या सर्व भक्तांसाठी मोफत ऑनलाईन महाप्रसाद बुकींगची व्यवस्था केलेली आहे.
ही व्यवस्था संपूर्णतः मोफत असून त्याचा लाभ सर्व भक्त घेऊ शकतील श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळात सन 1988 पासून अक्कलकोटात येणाऱ्या सर्व स्वामीभक्तांसाठी महाप्रसादाची सोय केली जाते. दिवसेंदिवस भक्तांचा ओघ वाढतच आहे त्यामुळे अगदी सुरुवातीला सुरू केलेल्या अन्नछत्रा चे मोठ्या वटवृक्षात रूपांतर झाले.भक्तांच्या सोयीसाठी रांगेतून नियोजन सुरू झाले आणि प्रत्येक पंगत संपून पुढची पंगत सुरू होई पर्यंत भक्तांना उभे राहावे लागते. ह्या सर्व बाबींचा विचार करून, श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाने असा निर्णय घेतला की प्रत्येक पंगतीच्या काही जागा राखीव ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग करणाऱ्यांसाठी ठेवाव्यात आणि त्यानुसार सर्व तांत्रिक बाबींची पूर्तता करून आम्ही ऑनलाइन महाप्रसाद बुकिंग ची सोय सर्व भक्तांसाठी केलेली आहे. ज्यामुळे सर्व स्वामीभक्तांचा वेळ वाचेल आणि त्यांना त्यांच्या वेळेचे नियोजन नेमकेपणाने करता येईल,त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा आणि महाप्रसादाची वेळ यांची सांगड योग्य रीतीने घालता येईल. अशा सर्व बाबींना गृहीत धरून श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ ट्रस्ट अक्कलकोट तर्फे सुरू करण्यात येणाऱ्या या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग सेवेचा आपण लाभ घ्यावा व या योजनेची माहिती अक्कलकोटास नजीकच्या काळात येऊ इच्छिणाऱ्या स्वामीभक्तांना द्यावी,असे आवाहन करण्यात आले आहे.

ऑनलाईन महाप्रसाद बुकिंगची प्रक्रिया

1) www.swamiannacchatra.org ह्या वेबसाईट वर जाऊन तिथे
असलेल्या ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग ह्या बटण ला क्लिक करावे.

2) त्या नंतर पुढील ३ महिन्यासाठीच्या तारखांचे विवरण दिसेल. 3. त्या कॅलेंडर वरील आपल्याला ज्या तारखेसाठी महाप्रसाद घ्यावयाचे आहे
त्या तारखेवर क्लिक करावे.

4) नंतर येणारा फोर्म भरावा आणि submit करावे.

5) फॉर्म सबमिट केल्यावर आपणास एक QRcode मिळेल तो डाऊनलोड करावा आणि तो QRcode प्रवेशावेळेस प्रवेशद्वारावर दाखवावा.
वरील सेवा पूर्णतः मोफत असेल.ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करण्यासाठी आधार क्रमांक आणि मोबाईल क्रमांक आवश्यक आहे. तसेच एकावेळेस जास्तीत जास्त १० जणांसाठी ऑनलाईन महाप्रसाद बुकिंग करता येईल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!