---Advertisement---

राष्ट्रवादीत एकच सन्नाटा: प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील कोरोना पॉझिटिव्ह

On: February 18, 2021 10:09 AM
Follow Us:
---Advertisement---

मुंबई : देशात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे.. 42 दिवसांनंतर महाराष्ट्रात प्रथमच देशातील सर्वाधिक कोरोना रुग्ण नोंदवले गेले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासाठी आणि महाविकास आघाडी सरकारसाठी चिंतेची बातमी समोर आली आहे. राज्याचे जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ही माहिती स्वतः ट्विट करत दिली आहे. राष्ट्रवादीसाठी चिंतेचा विषय यांच्यासाठी की पक्षाच्या संवाद यात्रेनिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील संपूर्ण महाराष्ट्रात फिरत आहेत. पक्षचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्याशी ते संवाद साधत असल्याने त्यांचा संपर्क अधिक आलेला आहे.

”माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो. जितकं कामकाज व्हर्च्युअली करणे शक्य होईल सध्या तितके करण्याचा प्रयत्न करतो आहे. धन्यवाद!” असे जयंत पाटील यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!