ध्यास विश्वसार्ह बातमीचा

संजय राठोड मला भेटले तर त्यांना सांगेल…; अजित पवारांचे मोठे विधान

मुंबई: बीड जिल्ह्यातील परळी येथील तरुणी पूजा चव्हाण याने पुण्यात आत्महत्या केली. या प्रकरणाला राजकीय वळण लागले आहे. पूजा चव्हाणच्या अत्म्हत्येशी शिवसेनेचे नेते मंत्री संजय राठोड यांचा संबंध जोडला गेला आहे. संजय राठोड यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी समोर आली आहे. विरोधकांनी यावरून सरकारला लक्ष केले आहे. संजय राठोड हे गायब झाले असून त्यांना शोधण्यासाठी बक्षीस देण्याची टीका विरोधक करत आहे. दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. माध्यमांनी त्यांना संजय राठोड कोठे आहेत? असा सवाल केला असता. त्यांनी “मंत्री संजय राठोड मलाही भेटले नाही, मला भेटले तर त्यांना पत्रकारांना भेटा आणि पत्रकार परिषद घ्या असे सांगेल” असे अजित पवारांनी सांगितले.

कोणत्याही घटनेचा नीट तपास झाला पाहिजे, सत्य बाहेर येणे आवश्यक आहे. त्यासाठी तपास होणे गरजेचे आहे. या प्रकरणाचा तपास सुरु आहे, सत्य काय ते बाहेर येईलच? असेही अजित पवारांनी सांगितले.

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वात नीट चालू आहे. सरकारला काहीही धोका नाही असा दावा ही अजित पवारांनी केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!