अक्कलकोट, दि.१९ :कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ आणि महाराष्ट्र बहुजन
शिव जन्मोत्सव युवक मंडळ यांच्यावतीने न्यासाच्या परिसरात साधेपणाने पण उत्साहात छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठेची स्थापना करण्यात आली. मेघडंबरिस विविध आकर्षक फुलांनी सजविण्यात आले होते.
दरम्यान श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजयराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली व त्यांचे पुत्र प्रमुख कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्राणप्रतिष्ठा महाराष्ट्र बहुजन शिव जन्मोत्सव युवक मंडळाचे संस्थापक जेष्ठ नेते सुरेशचंद्र सूर्यवंशी, रामचंद्र घाडगे, श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे अध्यक्ष व जेष्ठ नगरसेवक महेश इंगळे, श्री फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब निंबाळकर, अक्कलकोट शहर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष मनोज निकम, उत्तर पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक देवेंद्र राठोड, शहर शिवसेना प्रमुख योगेश पवार, संपादक प्रविण देशमुख, मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष प्रविण घाडगे, शिवसेना शहर उपप्रमुख तेजस झुंजे व न्यासाचे उपाध्यक्ष अभय खोबरे, सचिव शामराव मोरे, विश्वस्त संतोष भोसलेयांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
न्यासाचे पुरोहित अप्पू पुजारी यांनी मंत्रांच्या जयघोषात विधीवात्त छत्रपतींच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमास छत्रपती शिवाजी महाराज की जय..! चा जयघोष व ढोलच्या निनादाने सलामी देण्यात आली. सदरचा सोहळा शासनाने नव्याने घालून दिलेल्या कोरोनाच्या पार्शवभूमीवर नियमाचे काटेकोरपणे पालन करीत संपन्न झाला.
याप्रसंगी वैभव नवले, शितल जाधव, राम मातोळे, गणेश भोसले, बाळासाहेब घाडगे, बाळासाहेब पोळ, विजय माने, चंद्रकांत कुंभार, किरण जाधव, संजय गोंडाळ, सागर गोंडाळ, वैभव मोरे, गोविंदराव शिंदे, विकी जाधव, महेश दिग्गे, आकाश शिंदे, शुभम कमनुरकर, अमित थोरात, ज्ञानेश्वर भोसले, संतोष माने, राहुल शिंदे, समर्थ घाडगे, फइम पिरजादे, किरण साठे, पिंटू साठे, विनायक तोडकर, सिद्धाराम कल्याणी, विशाल शिंदे, योगेश पवार, आकाश गडकरी, प्रथमेश पवार, दिनेश बंडगर, सुराज्य घाडगे, अतिश पवार, मुन्ना कोल्हे, एस.के.स्वामी, नितीन शिंदे, रोहित खोबरे, महांतेश स्वामी, निखील पाटील, सुरज सावंत, श्रीशैल कुंभार, संदीप नवले, लाला निंबाळकर यांच्यासह युवक कार्यकर्ते उपस्थित होते.
दरम्यान अन्नछत्र मंडळाच्या परिसरात असलेल्या शिवस्मारक, शिवसृष्टी, श्री स्वामी समर्थ वाटिका, आश्रयदाते कक्षातील छत्रपतींच्या पुतळ्यांचे पूजन कु.हर्षराजे अमोलराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी खासकरून चारकोप कांदीवली पक्षिम मुंबई येथील उमेश आग्रे, संदीप जोशी, प्रशांत पलांडे, गौरांग जानी, नितीन चव्हाण, भावेश पांचाळ, महिंद्र पवार, अनोज शिकलीगर यांच्यासह आदीजण उपस्थित होते. सदरचा सोहळा पाहून आनद व्यक्त केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर न्यासाने शासनाचे सर्व ते नियम पाळत उत्सव साजरा करण्यात आला.