---Advertisement---

टूलकिट प्रकरण: दिशा रवीच्या न्यायालयीन कोठडीत पुन्हा वाढ

On: February 19, 2021 5:25 PM
Follow Us:
---Advertisement---

नवी दिल्ली: केंद्र सरकारने केलेल्या कृषी कायद्याला विरोध म्हणून गेल्या ८५ दिवसांपासून दिल्ली सीमेवर आंदोलन सुरु आहे. हे आंदोलन भडकविण्यात आल्याचे आरोप होत असून अनेकांना यासाठी जबाबदार धरले जात आहे. सध्या देशभरात कथित टूलकिट प्रकरण गाजत आहे. दिल्ली पोलिसांनी टूलकिट प्रकरणात दिशा रवीला अटक केली आहे. दरम्यान आज शुक्रवारी दिल्ली न्यायालयाने दिशा रवीला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली असून त्याची कोठडीत रवानगी करणायत आली आहे. याआधी न्यायालयाने दिशाला ५ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. कोठडीची मुदत संपताच दिल्ली पोलिसांनी ३ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून मागितली होती. मात्र, न्यायालयाने दिशाला ३ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!