ध्यास विश्वसार्ह बातमीचा

कोरोना वाढीमुळे शेअर मार्केटमध्ये निगेटिव्हीटी; सेन्सेक्समध्ये मोठी पडझड

मुंबई: कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा एकदा वाढू लागल्याने अर्थव्यवस्था पुन्हा एकदा संकटात सापडण्याचे चिन्ह आहे. कोरोनाने डोकेवर काढल्याने लॉकडाउनचे संकेत आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवरही होतांना दिसत आहे. आज सकाळपासून शेअर मार्केटमध्ये निगेटिव्ह वातावरण आहे. विक्री अधिक झाल्याने सेन्सेक्समध्ये घसरण झाली आहे. आज सेन्सेक्समध्ये ११०० अंकांहून खाली गेला आहे. पडझडीमुळे सेन्सेक्स ५० हजारांच्या खाली जाऊन ४९ हजार ८०० पर्यंत पोहोचला आहे. आज गुंतवणूकदारांचे कमीत कमी २.६ लाख कोटींचे नुकसान झाले आहे. कंपन्यांचे बाजार भांडवल २०३ लाख कोटींवरुन २०१ लाख कोटी झाले आहे.

आयटी, बँका, वित्त संस्था, ऑटो या क्षेत्रात गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला आहे. सेन्सेक्सचे ३० पैकी २७ शेअर घसरले आहेत. ज्यात एचयूएल, नेस्ले, टायटन, भारती एअरटेल, इन्फोसिस, बजाज फायनान्स, आयटीसी, रिलायन्स इंडस्ट्रीज, बजाज फिनसर्व्ह, एचडीएफसी, टीसीएस, एसबीआय, एचसीएल टेक, एशियन पेंट्स, अल्ट्राटेक सिमेंट या शेअरचा समावेश आहे. तर ओएनजीसी, एचडीएफसी बँक आणि कोटक महिंद्रा बँक या तीन शेअरमध्ये वाढ झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!