अहमदाबाद: गुजरातमधील सहा महानगरपालिकांच्या निवडणुकींची मतमोजणी आज मंगळवारी झाली. यात भाजपने २७० पेक्षा अधिक तर कॉंग्रेसला ५० च्या जवळपासच जागांवर विजय मिळाला आहे.
विशेष म्हणजे या निवडणुकीमध्ये अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पार्टीने अनपेक्षित यश मिळवत, गुजरातमध्ये एन्ट्री केली आहे. त्याचप्रमाणे एमआयएमनेही गुजरातमध्ये खाते उघडले आहे. सूरतमध्ये काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर आहे. सूरत महापालिकेचे जे प्राथमिक निकाल हाती आले आहेत त्यानुसार १२० जागांपैकी भाजपा आणि आपने समान म्हणजे आठ जागा जिंकल्या आहेत. तर काँग्रेसने सहा जागांवर बाजी मारलीय. सध्या येथे भाजपा ४० जागांवर तर काँग्रेस आणि आप प्रत्येकी १० जागांवर आघाडीवर आहे.