मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोने, चांदीच्या दरात घसरण झाली होती. ५२ हजारापर्यंत पोहोचलेले सोन्याचे दर ४६ हजाराच्या जवळ आले होते. मागील आठ महिन्यातील सोन्याचा हा सर्वात कमी दर होता. आज बुधवारी २४ रोजी या आठवड्यातील सलग दुसऱ्यांदा सोने आणि चांदीच्या दरात वाढ झाली आहे. आज सोने ५० रुपयांनी वधारले असून चांदीमध्ये २०० रुपयांची वाढ झाली आहे. मागील दोन दिवसात सोने ७५० रुपयांनी वाढले आहे. सोन्याचा १० ग्रॅमसाठी ४६९५० इतके आहे. सोमवारी सोने ७०३ रुपयांनी वधारले होते. सोन्याचा भाव ४६९०० रुपयांवर बंद झाला होता. काल मंगळवारी चांदीमध्ये १४५३ रुपयांची वाढ झाली होती. एक किलो चांदीचा भाव ७०४६५ रुपयांवर स्थिरावला होता.
आज बुधवारी सोन्याचे दर २४ कॅरेटसाठी ४६९६ रुपये प्रती ग्रॅम आहे. २२ कॅरेट सोन्याचे दर ४५९५ रुपये ग्रॅम आहे.
अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्कात ५ टक्के कपात करण्याची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर सोन्यात सातत्याने घसरण सुरु आहे. गेल्या तीन आठवड्यात सोने जवळपास तीन हजारांनी स्वस्त झाले आहे. कोरोनाचा फटका सोने व्यापाराला ही बसत आहे.