पुणेः राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने संचारबंदीसह अनेक निर्बंध घालण्यात आले आहे. करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याने पुण्यात निर्बंध कठोर करण्यात आले आहेत. रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली होती. त्यानंतर आज पुण्यातील रात्रीची संचारबंदी १४ मार्चपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे शहरातील शाळा, महाविद्यालये आणि कोचिंग क्लास बंद राहणार आहेत.
पुणे महानगरपालिका हद्दीत करोना संसर्ग वाढत असल्यानं खबदारी म्हणून महाविद्यालये आणि कोचिंग क्लास १४ मार्च २०२१ पर्यंत बंदच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रात्री ११ ते सकाळी ६ पर्यंत संचार निर्बंध कायम असणार आहेत. रात्री ११ ते सकाळी ६ या वेळेत पुणे महानगरपालिका हद्दीत संचार निर्बंध कायम ठेवण्यात आले असून अत्यावश्यक सेवा, शिफ्टमध्ये कामकाज करणाऱ्यांना यात मुभा देण्यात येत आहे. तर, अनावश्यक फिरणाऱ्यांवर कारवाई सुरु राहणार आहे, असंही महापौरांनी सांगितलं.