---Advertisement---

संजय राऊतांचे एक ट्विट आणि संजय राठोडांच्या राजीनाम्याची चर्चा

On: February 28, 2021 1:10 PM
Follow Us:
---Advertisement---

मुंबईः टिक टॉक स्टार पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणी शिवसेनेचे नेते वनमंत्री संजय राठोड चांगलेच वादात सापडले आहे. संजय राठोड यांच्या राजीनाम्यासाठी भाजपकडून राज्यभरात आंदोलन केले जात आहे. संजय राठोड यांचा राजीनामा घेतल्याशिवाय अधिवेशन चालू देणार नाही अशी भूमिकाच भाजपने घेतली असल्याने सरकारवरील दबाव वाढला आहे. दरम्यान शिवसेना नेते खासदार  संजय राऊत यांनी एक ट्विट केल्याने संजय राठोड यांच्या राजीनाम्याची चर्चा सुरू झाली आहे.

संजय राऊत यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा छायाचित्र असलेला फोटो ट्वीट केला आहे. त्यावर सिंहासनाधिष्ठीत छत्रपती शिवरायांच्या हातातील हा राजदंड काय सांगतो?, महाराष्ट्र धर्म म्हणजेच राजधर्माचे पालन, असा मजकूर असलेलं ट्वीट केलं आहे. संजय राऊतांच्या या ट्वीटनंतर मुख्यमंत्र्यांनी संजय राठोड यांना राजीनामा देण्यास सांगण्यात आल्याची चर्चा सुरु आहे. मात्र, संजय राऊत यांनी या ट्वीटवर स्पष्टीकरण दिले असून या ट्विटचा वेगळा अर्थ काढण्याची गरज नसल्याचे सांगितले आहे. आहे.

मुख्यमंत्री कोणाच्याही दबावाला बळी पडत नाहीत. त्यांना कशाचीही आठवण करुन देण्यासाठी ट्वीटची गरज पडत नाही. हे ट्वीट आहे ते सर्वव्यापक व सर्वसमावेशक आहे,’ असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!