मुंबई: पूजा चव्हाण आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले वनमंत्री संजय राठोड यांनी आज रविवारी अखेर राजीनामा दिला आहे. यावर विरोधी पक्ष नेते माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. आरोप झाल्यानंतर पहिल्याच दिवशी हा राजीनामा दिला गेला पाहिजे होता. कारण पुरावे आहेत ते पाहता मंत्रिपदावर राहणे हे चूक होते. मात्र वरिष्ठांचा आशिर्वाद आहे हे माहित असल्याने त्यांनी राजीनामा दिला नव्हता असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. राजीनामा देऊन विषय संपलेला नाही आता एफआयआर दाखल झाला पाहिजे, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.
उद्यापासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होत असून संजय राठोड यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने केली होती. या प्रकरणात संजय राठोड यांना वाचवण्याचा सर्व प्रयत्न झालेला आहे. सर्वांच्या दबावामुळे सरकारला उपाय उरला नसल्याने हा राजीनामा घेतला गेला आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.