अक्कलकोट, दि.२८ : अक्कलकोट तालुक्यातील बोरी उमरगे ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवड करण्यात आली. यात सरपंचपदी श्रीमती निलाबाई तात्यासाहेब बिराजदार तर उपसरपंच बसवराज साखरे यांची निवड करण्यात आली.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य निर्मलाताई नागेश बिराजदार, दत्तकुमार उंबरे, शांताबाई लक्ष्मण तेलुगु, लक्ष्मीबाई बिराजदार, पॅनल प्रमुख पंडित पाटील, नागेश बिराजदार, सिद्धाराम बाके, उमेश बिराजदार, लक्ष्मीकांत बिराजदार व बोरीउमरग्याचे ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे उपाध्यक्ष अभय खोबरे हस्ते नूतन ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार करण्यात आला.