---Advertisement---

काझीकणबस सरपंचपदी सिद्धराम धर्मसाले तर उपसरपंचपदी दत्तात्रय मुनाळे यांची निवड

Follow Us:
---Advertisement---

अक्कलकोट, दि.२८ : संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागलेल्या ग्रामपंचायत काझीकणबस सरपंचपदी सिद्धराम धर्मसाले तर उपसरपंचपदी दत्तात्रय मुनाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. निवडणूक अधिकारी म्हणून एन एस शिंदे,तलाठी समाधान काळे, ग्रामसेवक गुरव यांनी काम पाहिले.

नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत काझीकणबस निवडणुकीत मुनाळे – धर्मसाले‌- बंदिछोडे- मजगे यांच्या पॅनेलने ९ पैकी ६ जागा जिंकून वर्चस्व सिद्ध केले होते.यावेळी नुतन ग्रामपंचायत सदस्या अनुसया बंदीछोडे, महादेवी मजगे, सुनीता धर्मसाले, लताबाई मजगे निवडून आले.

विशेष म्हणजे चार महिला सदस्यांचे माहेर व सासर काझीकणबस आहे.या महिला सदस्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती अक्कलकोटचे माजी चेअरमन प्रभाकर मजगे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी नारायण बंदिछोडे, अर्जुन बंदिछोडे, परमेश्वर मजगे, सोपान गायकवाड , विश्वनाथ गयाळे , शेखर मंठाळे , रावसाहेब धर्मसाले, मधुकर धर्मसाले, राम हाले, किरण गायकवाड आदी उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!