दक्षिण सोलापूर, दि. 26- इंगळगी ग्रामपंचायतीवर भाजपची एकहाती सत्ता स्थापन झाली असून सरपंचपदी आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या गटाच्या लक्ष्मी विद्याधर वळसंगे यांची तर उपसरपंचपदी गोदावरी प्रधान गुरव यांची बिनविरोध निवड झाली आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी मेंगर्थी यांच्या अध्यक्षतेखाली सरपंच व उपसरपंच निवडीचा कार्यक्रम पार पडला. यावेळी सरपंचपदासाठी वळसंगे व उपसरपंचपदी गुरव यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली. नऊ सदस्य संख्या असलेल्या इंगळगी ग्रामपंचायत निवडणुकीत तीन जागा बिनविरोध झाल्या आहेत तर सहा जागांसाठी निवडणूक लागली होती. यामध्ये भाजपच्या आमदार सुभाषबापू देशमुख यांच्या गटाचे वर्चस्व राहिले आहे.
पार्वती वंजारे, सिद्धेश्वर घोडके, विनोद बनसोडे यांची सदस्य म्हणून बिनविरोध निवड झाली. बिनविरोध सदस्य आणि निवडून आलेल्या तीन सदस्यांनी एकत्रित येत सत्ता स्थापन केली. सत्ता स्थापन करण्यासाठी युवा उद्योजक शिवानंद हत्तुरे, जितेंद्र गायकवाड, सागर धुळवे, किशोर माळी, जगदीश दसाडे, राजशेखर बंडगर, राजकुमार देशमुख, सचिन वळसंगे, मारुती रणखांबे, यल्लाप्पा मासले, सोमनाथ फताटे, सुभाष उपासे, अमर पाटील, माजी सैनिक चंद्रकांत गाडेकर, आमसिद्ध कोरे, राम माने, भगवान राऊत, फैय्याज शेख, मौलाली शेख, सिराज शेख, माजी सरपंच रेवणसिध्द उपासे आदींचे योगदान महत्त्वपूर्ण ठरले. सर्वांना सोबत घेऊन गावाच्या विकासासाठी काम करणार असल्याचे नूतन सरपंच वळसंगे व नूतन उपसरपंच गुरव आणि सदस्यांनी सांगितले.