ध्यास विश्वसार्ह बातमीचा

काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने नोंदवला निषेध.

मुंबई : ‘अक्कड बक्कड बंबे बो, ८०, ९० पुरे १००’, ‘आपण पुन्हा आदिमानवांच्या दिशेने प्रवास करत आहोत का?’, असे फलक हातात घेऊन काँग्रेसने इंधन दरवाढीचा अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. काँग्रेसच्या सर्व मंत्री, आमदार आणि नेत्यांनी आज सायकलवरून प्रवास करत विधान भवन गाठले. यावेळी काँग्रेसचे सर्व बडे नेते उपस्थित होते.

देशात सध्या पेट्रोलचे भाव आकाशाला भिडले आहेत. सामान्य लोकांच्या खिशाला न परवडणाऱ्या टप्प्यात आता पेट्रोलचे भाव गेले आहेत. याच मुद्द्यावरुन काँग्रेसने आज राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विधानभवनात सायकलने येत केंद्र सरकारचा निषेध केला.

महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात हे सायकल आंदोलन करण्यात आले. काँग्रेसच्या मंत्र्यांनी आणि नेत्यांनी हातात इंधन दरवाढीचे निषेध नोंदवणारे फलक घेवुन आज सकाळी मंत्रालयासमोरील राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर जमले होते.

यावेळी नाना पटोले यांच्यासह माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, अशोक चव्हाण, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार प्रणिती शिंदे, मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांच्यासह काँग्रेसचे सर्वच आमदार उपस्थित होते

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!