ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अजित पवारांच्या ताफ्यावर दगड मारले पाहिजे

मुंबई: कालपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. वैधानिक विकास मंडळावरून विरोधकांनी सत्ताधार्‍यांना चांगलेच धारेवर धरले. सरकार विदर्भ, मराठवाड्यावर अन्याय करत असल्याचा आरेाप माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केला होता. फडणवीस यांनी काल अजित पवारांवर हल्लाबोल केला होता. त्यानंतर आज माजी खासदार निलेश राणे यांनीही अजित पवारांना लक्ष केले आहे. 12 आमदार जाहीर होतील, तेव्हा वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देऊ असं काल अजित पवार म्हणाले. मराठवाडा-विदर्भातील जनतेचा हा अपमान आहे. अजित पवार मराठवाडा-विदर्भात आले, तर त्यांचं स्वागत त्यांच्या ताफ्यावर दगडी मारून केला पाहिजे अशा शब्दात निलेश राणेंनी टीका केली आहे. 12 आमदार आणि विकास महामंडळाचा काय संबंध??, असा सवाल निलेश राणे यांनी केला आहे.

काल विदर्भ, मराठवाड्यातील जनता सरकारला माफ करणार नाही या शब्दात फडणवीस यांनी संताप व्यक्त केला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चांगलेच संतापले. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? 72 दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असा प्रश्न माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. ’अजित दादा तुम्ही विदर्भाच्या जनतेवर अन्याय करत आहात. विदर्भाची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अजित पवारांचा मी निषेध करतो’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!