नवी दिल्ली : सोन्याचा भाव मागील काही दिवसापासून घसरण सुरु आहे. मागील दोन दिवसांत यात काहीशी वाढ झालेली होती. मात्र पुन्हा देशांतर्गत बाजारात सोन्याची किंमत दहा महिन्यांच्या नीचांकी पातळीवर आली आहे. बुधवारी आठवड्याच्या तिसर्या दिवशी एप्रिल फ्युचर्स सोन्याच्या किंमती मल्टी कमोडिटी एक्सचेंज 0.27 टक्क्यांनी घसरल्या. गेल्या सात दिवसांपैकी सहा दिवस सोन्याच्या किंमती खाली आल्या. दरम्यान, चांदीचे दर वाढले आहेत. मार्च एमसीएक्समध्ये चांदी 0.82 टक्क्यांनी वधारत आहे.
बुधवारी, एमसीएक्सवरील एप्रिल सोन्याच्या वायद्याच्या किंमती 0.27 टक्क्यांनी कमी झाल्या म्हणजेच 124 रुपयांनी घसरून 45,424 रुपयांवर आल्या. आंतरराष्ट्रीय बाजारात एप्रिल वायदा सोन्याचा भाव प्रति औंस 1736.95 डॉलर होता. मंगळवारी दिल्लीच्या सराफा बाजारात 99.5 टक्के शुद्धतेसह 10 ग्रॅम सोन्याची किंमत 45,439 रुपयांवरुन 44,760 रुपयांवर आली आहे.
आज 22 कॅरेट सोन्याचे भाव चेन्नईमध्ये 42,860 रुपये, मुंबईत 44,410 रुपये, दिल्लीत 45,240 रुपये, कोलकातामध्ये 44,630 रुपये, बंगळुरूमध्ये 42,450 रुपये, पुण्यात 44,410 रुपये आहेत. अहमदाबादमध्ये 45,630 रुपये, जयपूर-लखनऊमध्ये 44,240 रुपये आणि पाटण्यात 44,410 रुपये प्रति 10 ग्रॅम.
एमसीएक्सवरील मार्च चांदीचा वायदा 0.82 टक्क्यांनी म्हणजेच 551 रुपयांनी वाढून 67,890 रुपये प्रति किलो झाली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीची किंमत प्रति डॉलर 26.85 डॉलर होती. मंगळवारी एक किलो चांदीची किंमत 1,847 रुपयांनी घसरून 67,073 रुपये प्रति किलो झाली. तर आधीचे ट्रेडिंग सत्र 68,920 रुपये प्रति किलोवर बंद झाले.