---Advertisement---

वसतिगृहातील तरूणींना कपडे काढून नाचवले: जळगावच्या घटनेवरून राज्यभरात संताप

On: March 3, 2021 2:26 PM
Follow Us:
---Advertisement---

जळगाव: जळगावमधील शासकीय आशादीप महिला वसतिगृहात पोलिसांनी तरुणींना कपडे काढून नृत्य करण्यास भाग पाडण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून जिल्हाधिकाऱ्यांकडे यासंबंधी तक्रार करण्यात आली आहे. या घटनेवरून संपूर्ण महाराष्ट्रात संताप व्यक्त होत आहे. दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनात ही या प्रकरणाचे पडसाद उमटले. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी झालेली पहायला मिळाली. भाजपा आमदार सुधीर मुमगंटीवार यांनी राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी केली असता यावरुन सत्ताधारी आमदारांनी आक्षेप नोंदवला.

“सभागृहात सदस्यांनी अतिशय गंभीर मुद्दा उपस्थित केला आहे. हा इतका गंभीर विषय आहे अध्यक्ष महोदय की, उद्या माझी बहीण, तुमची बहीण एवढं एक सेकंद नजरेत आणा…तुम्ही जर गृहमंत्री असता तर खून केला असता. अशा पद्धतीने तुमच्या, माझ्या आई बहिणीला नग्न करुन, कपडे काढून नाचायला लावलं जातंय आणि आम्ही नोंद घेवू म्हणतात. इथं मृत मनाचे आमदार आहेत? आमचं मन जिवंत आहे. तळपायाची आग मस्तकात गेली पाहिजे. उत्तरात सांगितलं पाहिजे की, एक तासात चौकशी करतो. काय कारवाई करणार आहे याचा अहवाल घेतो…पण म्हणतात नोंद घेतो…हे पाप फेडावं लागेल. आमच्या आई-बहिणीला नग्न केलं जातं या महाराष्ट्रात आणि आम्ही नोंद घेतो,” अशा शब्दांत सुधीर मुनगंटीवार यांनी संताप व्यक्त केला.

Join WhatsApp

Join Now

Subscribe YouTube channel

Subscribe Now

Leave a Comment

Don`t copy text!