मुंबईः राज्य विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. सभागृहात रोज आरोप प्रत्यारोपाच्या फैर्या झडत आहे. काल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावर उत्तर देताना भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांना उत्तर देताना उद्धव ठाकरे यांना राज्यातील भाजपा नेत्यांसोबतच मोदी सरकारवरही निशाणा साधला. यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलनाचा उल्लेख करत शेतकर्यांच्या मार्गात खिळे आणि चीन दिसला तर पळे असा टोला लगावला. उद्धव ठाकरे यांच्या या विधानावर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतले आहे. उध्दव ठाकरेंचे विधान भारतीय सैन्यांचे अपमान करणारे असल्याची टीका भाजपा नेत्यांनी केली आहे.
भाजपा प्रवक्ते अतुल भातखळकर यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना उध्दव ठाकरे हे महाराष्ट्राचे राहुल गांधी आहे अशी टीका आमदार अतुल भातखळकर यांनी केले आहे. ट्वीट करत अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.
जवानांचा अपमान केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी देशाची माफी मागावी अशी मागणीदेखील अतुल भातखळकर यांनी केली आहे. जनता या ‘राहुल गांधीगिरी’चा समाचार घेईलच असंही ते म्हणाले आहेत.